नवी दिल्ली : ब्रिटन सरकार भारतासोबत अन्य 10 लोकशाही देशांसाठी 5 जी क्लब योजना उभारण्यासाठी अमेरिकेच्या संपर्कात आहे. यासंदर्भातील माहिती ब्रिटनच्या एका वृत्तपत्राच्या अहवालामधून दिली आहे. ब्रिटन सरकारने या अहवालात चीनची कंपनी हुआईसोबत जोडलेल्या समस्येच्या बाबतचाही योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचेही संकेत दिले आहेत. डी 10 क्लब या योजनेत जी 7 देशांमधील ब्रिटन, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि कॅनडासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि भारताचा समावेश केला आहे. या समूहाचे एकत्रितपणे 5 जी उपकरणे आणि त्यांच्या संदर्भातील व्यवस्था उभारण्यासाठीची योजना आखण्यासाठी काम करण्यावर भर देण्यात येणार आहे आणि यातून चीनवरील अवलंबून असणारी 5 जी नेटवर्क संदर्भातील योजना कमी करण्यावर काम करण्यात येणार असल्याचेही स्थानिक वृत्तपत्र द टाईम्सच्या माहितीमधून सांगितले आहे. आम्हाच्या सोबतीला नवीन भागीदाराची आवश्यकता आहे. आम्ही जरी बाजारापेठेत नवीन असलो तरीही हुवावे कंपनीसोबत पुढे जाण्याचा निर्णय थांबविण्यासाठीच हा मार्ग निवडत असल्याचेही ब्रिटन सरकारने म्हटले आहे. युरोपात फक्त नोकिया आणि एरिक्सन याच कंपन्या 5 जी संदर्भातील उपकरणाची निर्मिती करु शकते.
Previous Articleसामाजिक सुरक्षा योजना
Next Article युरोपात नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.