प्रतिदिन रुग्णसंख्या 40 हजारांवर -रशियात हजाराहून अधिक बळी
वृत्तसंस्था/ लंडन
जगभरात लसीकरण मोहीम राबवून देखील कोरोना महामारीला अद्याप आळा बसलेला नाही. अद्याप देखील अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणामुळे मोठय़ा संख्येत लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत अद्याप देखील प्रतिदिन 1.5 हजार लोकांचा महामारीमुळे मृत्यू ओढवत आहे. रशियात देखील चिंताजनक स्थिती ओ. तर ब्रिटनमध्ये निम्म्याहून अधिक लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस दिल्यावरही प्रतिदिन 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमध्येही म्युटेशन (उत्परिवर्तन) झाले आहे.
इंग्लंडमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमध्ये नवे म्युटेशन झाले असून ते अत्यंत वेगाने फैलावणारे आहे. डेल्टाच्या नव्या व्हेरियंटच्या फैलावावर नियमित स्वरुपात नजर ठेवली जात आहे. याला ‘एवाय.4.2’ नाव देण्यात आले आहे. याचबरोबर डेल्टाच्या ई-484के आणि ई-484क्यू व्हेरियंटचेही रुग्ण सापडत आहेत.
ब्रिटनच्या आरोग्य प्रमुखांनी सरकारला कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही उपाययोजना कायदेशीर स्वरुपात लागू करण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमध्ये मास्कची सक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग सामील आहे. ब्रिटनमध्रे प्रतिदिन 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. तर मंगळवारी 223 कोरोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे.