विरोधी लेबर पार्टीकडून मोदी अन् जॉन्सन यांच्या छायाचित्राचा वापर
वृत्तसंस्था/ लंडन
उत्तर इंग्लंडमध्ये पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचारसामग्रीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधी लेबर पार्टीने प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र वापरले आहे. पोस्टरवर पंतप्रधान मोदींशी मैत्री राखणारा पक्ष म्हणजेच सत्तारुढ खासदारापासून सांभाळून राहण्याचा संदेश आहे. लोकांनी कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला मत दिल्यास असे चित्र दिसण्याची जोखीम असल्याचे लेबर पार्टीचे म्हणणे आहे.
विरोधी लेबर पार्टीने मोदींना विरोध दर्शवून मते मिळविण्यासाठी ही आगळीक केली आहे. या प्रकारानंतर अनिवासी भारतीयांनी लेबर पार्टीला ‘विभाजनकारी’ आणि ‘भारतविरोधी’ ठरविले आहे. या प्रचारसामग्रीसंबंधी स्पष्टीकरण देऊ शकता का? लेबर पार्टीचा नेता जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीसाब्sात कुठलेच संबंध ठेवणार नसल्याचे स्पष्ट करू शकता का अशी विचारणा भारतीय समुदायाची संघटना कॉन्झर्वेटिव्ह प्रेंड्स ऑफ इंडियाने लेबर पार्टीचे नेते सर कीम स्टार्मर यांना केली आहे.
खासदाराकडून मुद्दा उपस्थित
कॉन्झर्वेटिव्ह नेते आणि टोरी खासदार रिचर्ड होल्डन यांनी ट्विटरवर या प्रचारसामग्रीचे छायाचित्र पोस्ट केले आहे. लेबर पार्टीचे नेते सर कीम स्टार्मर हे भारतीय पंतप्रधानांसोबत हस्तांदोलन करताना दिसून येणार नाहीत असा याचा अर्थ आहे का असा प्रश्नही होल्डन यांनी उपस्थित केला आहे.
लेबर पार्टीतही विरोध
या प्रचारसामग्रीवरून लेबर पार्टीच्या नेत्यांदरम्यानही संताप आहे. लेबर प्रेंड्स ऑफ इंडियाने हा फलक त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. लेबर पार्टीने स्वतःच्या लीफलेटवर जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि ब्रिटनच्या घनिष्ठ मित्रांपैकी एक भारताच्या पंतप्रधानांच्या छायाचित्राचा वापर करणे दुर्दैवी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. लेबर पार्टीतील भारतीय वंशाचे वरिष्ठ खासदार वीरेंद्र शर्मा यांनीही याप्रकरणी निंदा केली आहे.