वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील प्लायमाऊथ या शहरात एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गोळीबार करणाऱयाचे नाव जेक डेव्हिसन असल्याचे सांगण्यात आले. गोळीबार करून त्याने त्याच बंदुकीने आत्महत्या केली असेही दिसून आले आहे. हा दहशतवादी आत्मघाती हल्ला आहे काय? याचीही चौकशी होत आहे. मात्र प्राथमिक चौकशी आतापर्यंत तसे आढळले नसल्याचे सांगण्यात आले.