लंडन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व एकंदर नियंत्रणासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे ब्रिटन सरकारच्या लक्षात आले असून येत्या सप्टेंबरमध्ये वेगवान लसीकरणाची मोठी मोहिम हाती घेणार असल्याचे समजते. यासंबंधीची सविस्तर लसीकरणाची योजना आखण्यात आल्याचे सांगण्यात येते. सप्टेंबरनंतर ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू होत असून यापूर्वीच लसीकरण गतीमान करण्याचा इरादा सरकारने व्यक्त केला आहे. देशातील राष्ट्रीय स्वास्थ्य सेवा विभागाने बुस्टर लसीकरण कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. वार्षिक फ्लू लसीकरणासोबतच कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. लसीकरणामुळे संबंधीतांचे नवा व्हेरीयंट आला तरी संरक्षण होणार असल्याची बाब सरकारने नमूद केली आहे. लसीकरणामुळे किमान 6 महिने तरी आरोग्य सुरक्षा संबंधीतांना प्राप्त होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.