ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनमध्ये 108 वर्षीय आजींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हिल्डा चार्लिस असे या आजींचे नाव असून त्या एप्रिलला 109 वर्षांच्या होणार होत्या. ब्रिटनमधील त्या सर्वात वयस्कर कोरोना रुग्ण ठरल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिल्डा चार्लिस यांना मंगळवारी कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांना सॅल्फर्ड सिटी रूग्णालय भरती करण्यात आले. मात्र, आजी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
हिल्डा यांचा नातू अँथनी चर्चिल म्हणाला, दीड आठवड्यावर आजीचा वाढदिवस आला होता. पण आजी आधीच आम्हाला सोडून गेली. तिने दोन महायुद्ध आणि 1918 मधील स्पॅनिश फ्लूची साथ अनुभवली आहे.