112 कोटींमध्ये झाला मोठा करार
हॉलिवूडची सर्वात लोकप्रिय पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स आता लवकरच स्वतःच्या जीवनाशी निगडित अनेक रहस्यांची उकल करणार असून याकरता तिने कोटय़वधींचा करार केला आहे. ब्रिटनी स्पीयर्स आता लेखिका होणार आहे. सायमन अँड शुस्टर या प्रकाशनसोबत तिने पुस्तक लिहिण्याचा करार केला आहे.
3 महिन्यांपूर्वीच ब्रिटनीला वडिलांच्या ‘कन्झर्व्हेटरशिप’पासून मुक्ती मिळालेली आहे. सायमन अँड शुस्टरने ब्रिटनीच्या जीवनावर पुस्तक लिहिण्याचे हक्क विकत घेतले आहेत. यात तिचे जीवन, नातेसंबंधांपासून कारकीर्द, कुटुंब आणि वादांपर्यंतचा खुलासा केला जाणार आहे. पुस्तकासाठी 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 112 कोटी रुपयांचा करार करण्यात आल्याचे समजते.
3 महिन्यांपूर्वी ब्रिटनीला तिचे वडिल जेमी स्पीयर्स यांच्या 13 वर्षांच्या कन्झर्व्हेटरशिपपासून मुक्तता मिळाली होती. अमेरिकेच्या कायद्यानुसार कुठल्याही मानसिकदृष्टय़ा आजारी व्यक्तीचे कामकाज हाताळण्यासाठी न्यायालयाकडून एक गार्डियन म्हणजेच पालक नियुक्त केला जातो. यालाच कन्झर्व्हेटरशिप म्हटले जाते.