बर्लिन
सध्या जगभरातील विविध देशांमध्ये वाढत्या तापमानासह हवामान बदलामुळे विविध टप्प्यावर हवामानाची समीकरणे बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे. हाच मुद्दा विचारात घेत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन जूनमध्ये होणाऱया जी 7 समूहाच्या संमेलनात आपले मत मांडणार आहेत. विविध नेत्यांसह जलवायू बदलासंदर्भातील घटना हाताळण्यासाठी गरिब देशांना येत्या काळात मोठी आर्थिक मदत करणार असल्याचे जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. जॉन्सन यांनी पुढे म्हटले आहे, की सरकारजवळ विविध राजकीय मुद्दे सोडविण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे. परंतु यात 100 अब्ज अमेरिकन डॉलर जलवायू बदलावर निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच जर्मनीच्या सरकारप्रमाणे डिजिटल जलवायू कार्यक्रमात आपण अडचणीवर मार्ग काढू शकणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. यामुळे हवामान बदलाकडे अन्य देशांची पाहण्याची नजर बदलण्यास मोठी मदत होणार आहे.