महिन्याभराच्या टाळेबंदीनंतर ब्रिटनमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत 30 टक्क्यांची घट दिसून आली आहे. 16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत 10 हजार लोकांमागे 130 रुग्ण सापडले होते. तर टाळेबंदीनंतर 13 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हा आकडा कमी होत 96 वर आल्याचे अध्ययनात दिसून आले आहे.
यांच्याविषयीही जाणून घ्या…
इराक : फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच शाळा सुरू झाल्या आहेत. आठवडय़ातील 6 दिवस विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. सोशल डिस्टन्ंिसंगची पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे.
लेबनॉन : आर्थिक संकटाला तोंड देणाऱया देशाने निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. नाताळ आणि नववर्षापूर्वी अर्थव्यवस्थेला सुधारण्याचा प्रयत्न आहे.
तुर्कस्तान : येथील स्थिती सातत्याने बिघडत आहे, सलग 7 व्या दिवशी उच्चांकी (185) बळी गेले आहेत.
पॅलेस्टाईन : सुविधांच्या अभावामुळे येथे रुग्ण वाढू लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने गाझाच्या एका रुग्णालयाला 15 वेटिंलेटर्स प्रदान केले आहेत.