नवी दिल्ली
आपण बिस्किट खाणारे शौकीन असाल तर लक्षात घ्या, ब्रिटानिया कंपनी आपल्या उत्पादनांच्या किमती आगामी काळात वाढवणार आहे. बिस्कीटांच्या किंमती 7.50 टक्के ते 10 टक्के इतक्मया वाढणार असल्याचे समजते. इंधन दरात झालेली वाढ, तेलाच्या किमतीत झालेली वाढ व पॅकिंग साहित्याच्या वाढलेल्या किंमती यामुळे विविध उत्पादने येणाऱया काळात महागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खर्चात वाढ झाल्यामुळे उत्पादनांच्या किमती वाढवणे अपरिहार्य होते, असे कंपनीने म्हटले आहे.