ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली ‘ब्रिटिश एअरवेज’ ही आघाडीची विमान सेवा देणारी कंपनी आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. ब्रिटीश एअरवेजची मूळ कंपनी IAG (ICAGY) ने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे.
IAG ने काढलेल्या पत्रकानुसार, लॉकडाऊन मुळे हवाई वाहतूक बंद आहे. कोरोनामुळे विस्कटली हवाई वाहतूक पूर्वपदावर यायला काही वर्ष लागू शकतात. त्या काळात कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करावी लागणार आहे. अंदाजे 12 हजार कर्मचाऱ्यांना या काळात नारळ दिला जाऊ शकतो, असेही IAG ने म्हटले आहे.