राजपुत्र हॅरी यांच्या पत्नीचा गंभीर आरोप – मुलाच्या रंगामुळे राजघराण्याला होती समस्या
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी एका मुलाखतीत मोठे खुलासे केले आहेत. ब्रिटनचे राजघराणे माझ्या मुलाला म्हणजेच आर्चीला राजपुत्राचा दर्जा देण्यास इच्छुक नव्हते. कारण त्याच्या जन्मापूर्वी त्याचा रंग कृष्णवर्णीय असण्याची भीती त्यांना होती. आर्चीच्या जन्मापूर्वी राजघराण्याने राजपुत्र हॅरीशी यासंबंधी चर्चा केली होती, ही त्याच्यासाठी वेदनादायी होती असे मेगन यांनी ओप्रा विनप्रे यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
राजघराण्याशी जोडले गेल्यावर माझे स्वातंत्र्य बऱयाच अंशी कमी झाले होते राजघराण्यातील जीवन अत्यंत एकाकी होते. मित्रांसोबत भोजनासाठी जाण्याचीही अनुमती नव्हती. कारण अशा प्रकारांना प्रसारमाध्यमांमध्ये मोठे स्थान मिळायचे. मी मनाने पूर्ण खचले होते. मी जगू इच्छित नव्हते आणि माझ्या मनात आत्महत्येचेही विचार दाटून येत होते असा खुलासा मेगन यांनी केला आहे.
केट मिडलनटन यांचा उल्लेख
राजपुत्र हॅरी याच्याशी विवाहापूर्वी केट मिडलटन यांनी माझ्यावर रडण्याची वेळ आणली होती असे मेगन यांनी म्हटले आहे. केट या राजपुत्र विलियम्स यांच्या पत्नी आहेत. मेगन यांच्यानुसार विवाहसोहळय़ात वापरल्या जाणाऱया सामग्रीवरून केट नाराज होती. त्यावेळी स्थिती अत्यंत खराब होती.
मेगनवर गर्व- राजपुत्र हॅरी
मला माझ्यावर आणि पत्नीवर गर्व आहे, कारण गरोदर असताना तिला अत्यंत खडतर काळाला सामोरे जावे लागल्याचे उद्गार प्रिन्स हॅरी यांनी मुलाखतीदरम्यान काढले आहेत. राजघराण्यावर विश्वास ठेवणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. मला नेहमी सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन राजघराण्याने दिले होते, पण असे कधीच घडले नाही असा दावा मेगन यांनी केला आहे. राजकन्या डायना आज हयात असत्या तर राजघराण्यात जे काही घडले त्यावर त्या नाराज झाल्या असत्या असे हॅरी यांनी म्हटले आहे.
मुलीला जन्म देणार मेगन
मेगन आणि हॅरी यांनी मुलाखतीत होणाऱया अपत्यावरही नवा खुलासा केला आहे. उन्हाळय़ात एका मुलीचे आईवडिल होणार असल्याचे दोघांनीही म्हटले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू हॅरी आणि मेगन यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात प्रंटलाइन रॉयल डय़ूटीचा त्याग केला होता आणि आता हे दांपत्य कॅलिफोर्नियात वास्तव्याला आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये दोघांनीही डय़ूक ऑफ ससेक्स आणि डचेस ऑफ ससेक्सची पदवी सोडण्याची घोषणा केली होती.