वृत्तसंस्था / ब्रिस्बेन :
रविवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील ब्रिस्बेन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत झेकच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिसकोव्हाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
एकेरीच्या अंतिम सामन्या प्लिसकोव्हाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 6-4, 4-6, 7-5 असा पराभव पेला. प्लिसकोव्हाला या विजयासाठी दोनतास झगडावे लागले. प्लिसकोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे 16 वे विजेतेपद असून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत तिने तिसऱयांदा ब्रिस्बेन टेनिस स्पर्धा जिंकली आहे. या जेतेपदानंतर आता प्लिसकोव्हा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.