वृत्तसंस्था/ ब्रिसबेन
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत ब्रिस्बेन हिट संघाचा कर्णधार ख्रिस लिन याला स्नायू दुखापत झाली असून तो किमान सहा आठवडे क्रिकेटपासून अलिप्त राहणार आहे.
या दुखापतीमुळे ख्रिस लिनला बिग बॅश क्रिकेट स्पर्धेतील आगामी होणाऱया ब्रिस्बेन हिट संघाच्या सहा सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यांचा 14 जानेवारीला मेलबोर्न रेनेगेडस् संघाबरोबर सामना होणार असून या सामन्यात खेळण्यासाठी लिनचे प्रयत्न सुरू आहेत. 23 डिसेंबर रोजी गब्बा मैदानावर झालेल्या सरावाच्या सामन्यात धावत झेल टिपण्याच्या प्रयत्नात लिनला ही स्नायू दुखापत झाली आहे.