मुंबई
मुंबईमध्ये कॅनडाच्या ब्रुकफिल्ड या कंपनीने 30 एकरची जागा नुकतीच खरेदी केली असल्याचे समजते. सदरचा व्यवहार हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मानला जात आहे. नवी मुंबईजवळ कंपनीने 30 एकरचा प्लॉट खरेदी केला असून त्यावर डाटा सेंटरचे केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती आहे. सदरचा प्लॉट कंपनीने 600 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे सांगण्यात येते. बाजारभावाप्रमाणे सदरची जागा खरेदी झाली असल्याचे समजते.