नवी दिल्ली
ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंटने मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जेट एअरवेजचे ऑफिसचे दोन मजले नुकतेच खरेदी केले असल्याचे सांगण्यात येते. ही खरेदी 490 कोटी रुपयांना झाल्याचे समजते. दोन्ही मजल्यांना लिलावात वरील राखीव किंमतीची अंतिम बोली होती. ब्रुकफिल्डने वरील किंमतीला दोन मजले खरेदी करण्याचे अंतिम केले. कॅनडातील या कंपनीकडे भारतात 2.5 कोटी चौ. फू. इतकी व्यावसायिक जागा आहे. बाजारभावाप्रमाणे योग्य किंमतीला बुकफिल्डने व्यवहार केला असल्याचे सांगितले जात आहे.