लाहोर : पाक क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रॅण्ट ब्रॅडबर्न तसेच माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांचे पाक क्रिकेट मंडळातील वैयक्तिक योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांच्यावर आता पीसीबीने नवी जबाबदारी सोपविली आहे. ब्रॅडबर्न यांची सर्वोच्च प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी तर सकलेन मुश्ताकची आंतरराष्ट्रीय प्लेअर विकास विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
न्यूझीलंडचे माजी फिरकी गोलंदाज ब्रॅडबर्न हे पाकच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. 2018 सप्टेंबरमध्ये पीसीबीने ब्रॅडबर्न यांची या पदावर नियुक्ती केली होती. तत्पूर्वी बॅडबर्न यांनी स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला बहुमोल मार्गदर्शन केले होते.
1990 ते 2001 या कालावधीत ब्रॅडबर्न यांनी सात कसोटी आणि 11 वनडे सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.
असून त्यांनी आपल्या प्रशिक्षण कारकीर्दीत न्यूझीलंड अ आणि न्यूझीलंड युवा संघाला प्रशिक्षण दिले आहे.