वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटन व युरोपियन महासंघ यांच्यात ‘बेक्झिट’ संबंधी अखेर समझोता झाला आहे. ब्रिटन महासंघातून बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये व्यापारी संबंध कसे राहतील यावर एकमत बनविण्यात यश आले आहे. पुढील आठवडय़ात ब्रिटन महासंघातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे हा समझोता होणे अत्यंत महत्त्वाचे होते.
महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनला आता त्याचे चलन, सीमारेषा, कायदे आणि व्यापार यासंबंधीचे स्वातंत्र्य परत मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिटिश पंतप्रधानांच्या निवासस्थानाहून व्यक्त करण्यात आली. महासंघाबरोबर करण्यात आलेल्या समझोत्यानुसार ब्रिटन आणि महासंघ यांच्यात मुक्त व्यापार होणार असून दोन्ही पक्ष एकमेकांच्या उत्पादनांवर कर लावणार नाहीत, असे ठरविण्यात आले.
स्वातंत्र्य परत मिळाले
या समझोत्यामुळे ब्रिटनवर आता युरोपियन महासंघाच्या कायद्यांचे पालन करण्याचे बंधन राहणार नाही. तसेच ब्रिटनच्या देशी बाजारपेठेला संरक्षण प्राप्त होईल. तसेच स्थलांतरितांचे बंधनही ब्रिटनवर राहणार नाही. 2019 मध्ये झालेल्या 668 अब्ज पौंडांच्या उलाढालीलाही आता हा नवा समझोता लागू राहील. तसेच युरोपियन महासंघाच्या न्यायालयाचेही ब्रिटनवर बंधन राहणार नाही. या समझोत्यामुळे जणू ब्रिटनला त्याचे स्वातंत्र्य परत मिळाले आहे, असे सांगण्यात आले. या समझोत्यासाठी ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात प्रामुख्याने चर्चा केली गेली. अखेर दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या काही अटी मान्य केल्यानंतर समझोता शक्य झाला. ही ब्रिटनसाठी शुभवार्ता असल्याचे प्रतिपादन ब्रिटीश सरकारने केले असून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ती मिळाली आहे.
स्वातंत्र्य परत मिळाले
या समझोत्यामुळे ब्रिटनवर आता युरोपियन महासंघाच्या कायद्यांचे पालन करण्याचे बंधन राहणार नाही. तसेच ब्रिटनच्या देशी बाजारपेठेला संरक्षण प्राप्त होईल. तसेच स्थलांतरितांचे बंधनही ब्रिटनवर राहणार नाही. 2019 मध्ये झालेल्या 668 अब्ज पौंडांच्या उलाढालीलाही आता हा नवा समझोता लागू राहील. तसेच युरोपियन महासंघाच्या न्यायालयाचेही ब्रिटनवर बंधन राहणार नाही. या समझोत्यामुळे जणू ब्रिटनला त्याचे स्वातंत्र्य परत मिळाले आहे, असे सांगण्यात आले. या समझोत्यासाठी ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात प्रामुख्याने चर्चा केली गेली.
अखेर दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या काही अटी मान्य केल्यानंतर समझोता शक्य झाला. ही ब्रिटनसाठी शुभवार्ता असल्याचे प्रतिपादन ब्रिटीश सरकारने केले असून ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ती मिळाली
आहे.