कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या चर्चासत्रात माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
वार्ताहर/ दुकानवाड
वर्षभरात माणगाव खोऱयात ‘स्लॉटर हाऊस’ तयार करणार असल्याची ग्वाही माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माणगाव खोऱयातील कुक्कुटपालन व्यावसायिकांना दिली.
भाजपच्या सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ब्रॉयलर पक्षांचे स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) सुरू करण्याच्या उद्देशाने माणगाव खोऱयातील कुक्कुटपालन व्यावसायिकांचे चर्चासत्र माणगाव येथील राधाकृष्ण सभागृहात झाले. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, प्रकाश मोर्ये, भगिरथ प्रति÷ानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, प्रभाकर सावंत, माणगाव सरपंच जोसेफ डॉन्टस्, तालुकाध्यक्ष विनायक राणे, बंडय़ा सावंत, राजू राऊळ, दीपक नारकर, मोहन सावंत, आनंद शिरवलकर, महिला तालुका अध्यक्षा प्रतिभा घावनळकर, तालुका उपाध्यक्ष राजा धुरी, श्रावण धुरी, सचिन धुरी, योगेश बेळणेकर, प्रकाश म्हाडगूत, संजय सावंत आदी उपस्थित होते.
व्यवसायासाठी पैसे कमी पडू देणार नाही!
चव्हाण म्हणाले, माणगाव खोऱयात कुक्कुटपालन व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. जिल्हय़ातील 75 टक्के व्यवसाय एकटय़ा माणगाव खोऱयात आहे. येथील वातावरणही त्याला अनुकूल आहे. माणसे मेहनती आहेत. परंतु येथील व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रसंगी आर्थिक नुकसान सोसावे लागते. 50 ते 60 टक्के व्यावसायिक दुसऱयावर अवलंबून आहेत. त्यातून व्यावसायिक कर्जबाजारी होतात. पुन्हा व्यवसाय उभा करू शकत नाहीत, अशी अवस्था होते. याला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी वेगवेगळय़ा क्षेत्रात असणाऱया अडचणी जाणून घेऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अनेक योजना आणल्या. त्या योजनांमध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय समाविष्ट केला. स्वावलंबी बनविण्याची मानसिकता तयार करा. व्यवसायासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. संजय सावंत, दिनेश म्हाडगूत, मोहन सावंत यांनी कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. अतुल काळसेकर, राजन तेली, डॉ. प्रसाद देवधर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.