वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या शेअर बाजारासोबत म्युच्युअल फंडकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये विविध फंड्सनी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. ब्लूचिप फंड्सने मागील वर्षभरात जवळपास 26 टक्क्यांचा परतावा दिल्याची माहिती आहे.
काय असते ब्लूचिप फंड?
यामध्ये लार्जकॅप म्युच्युअल फंड आहे, साधारण यामध्ये लार्जकॅप म्युच्युअल फंडने आपल्या नावासोबत ब्लूचिपची जोड दिली आहे. यामध्ये ऍक्सिस ब्लूचिप फंड, आयसीआयसीआय प्रू ब्लूचिप फंड, स्टेट बँक ब्लूचिप फंड, कोटक ब्लूचिप फंड किंवा फ्रँकलिन ब्लूचिप फंड यांचा समावेश असतो. या व्यतिरिक्त लार्ज आणि मिड कॅप सेग्मेंटमधून मिराए असेंट इमर्जिग ब्लूचिप फंड, प्रिंसिपल इमर्जिग ब्लूचिप फंड आहे. तसेच ब्लू चिप फंडची कोणतीही वेगळी वर्गवारी नसल्याची माहिती सेबीने दिली आहे.
खालील ब्लूचिप फंड्सचा योग्य परतावा
फंडचे नाव वर्षातील तीन वर्षातीलप्
परतावा(टक्के) परतावा(टक्के)
कॅनरा रोबेकोब्लूचिप इक्विटी 25.7 17.7
युटीआय मास्टर शेअर युनिट 21.4 11.2
ऍक्सिस ब्लूचिप फंड 20.9 16.3
एडेलवाईसेस लार्ज कॅप फंड 20.5 11.9
कोटक ब्लूचिप फंड 19.8 11.1
एसबीआय ब्लूचिप फंड 19.6 14.3
बीएनपी परिबास लार्ज कॅप 19.3 11.2