ऑनलाईन टीम / लडाख :
चीनची टेहाळणी यंत्रणा आणि कॅमेरे असलेल्या ब्लॅक टॉप पोस्टवर भारताने कब्जा केला आहे.
ब्लॅक टॉप ही पोस्ट भारतीय हद्दीतच येते. मात्र, चीनने या भागावर घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय सैन्याने दोन दिवसांपूर्वी चिनी सैन्याला मागे हटवत या पोस्टवर ताबा मिळवला. तसेच चीनची टेहळणी यंत्रणा आणि कॅमेरेही हटवले. समरिकदृष्ट्या ही पोस्ट भारतासाठी महत्वाची होती.
ब्लॅक टॉप ही पोस्ट नियंत्रण रेषेजवळ आहे. भारतीय जवानांच्या हालचाली टिपण्यासाठी चीनने या भागात स्वयंचलित कॅमेरे आणि सेन्सर लावले होते. 29-30 ऑगस्टच्या मध्यरात्री भारताने चीनची घुसखोरी रोखल्याने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. सीमारेषेवर दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली आहे.