रुग्णसंख्या 430 वर, धोका कायम
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात ब्लॅक फंगसचा धोका कायम आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 47 जणांचा बळी गेला असून एकूण बाधितांची संख्या 430 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने यासंबंधीची माहिती दिली आहे.
गेल्या एक-दीड महिन्यापासून ब्लॅक फंगसचा फैलाव वाढतो आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 228 जणांवर तर 202 बाधितांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले असून 355 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 298 जण बरे होऊन डिस्चार्ज झाले आहेत. अद्याप सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 85 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.
दुसरी लाट सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख 70 हजार 783 हून अधिक जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 50 हजार 406 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 48 हजार 713 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱया लाटेत मृतांचा सरकारी आकडा 503 इतका आहे. अद्याप 1 हजार 190 सक्रिय रुग्ण आहेत. दुसऱया लाटेनंतरच ब्लॅक फंगसचा फैलाव सुरू झाला.
ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी 6 हजार 223 ऍम्पोटेरिसिन-बी लसपुरवठा झाला आहे. यापैकी सिव्हिल हॉस्पिटलला 3 हजार 623 वाईल पुरविण्यात आल्या आहेत. तर 3 हजार 303 वाईल खासगी इस्पितळांना पुरविण्यात आल्या. ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या वाढतीच आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 14 लाख 74 हजार 641 जणांना लस देण्यात आली आहे. 37 लाख, 5 हजार 696 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. कोव्हॅक्सिनचा साठा संपला असून कोविशिल्डचे 10 हजार 110 वाईल उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 22 लाख 95 हजार 517 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 11 मेपासून आतापर्यंत 4 लाख 6 हजार 984 जणांना लस देण्यात आली आहे.
कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला 34.39 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी आतापर्यंत 28.29 कोटी खर्च करण्यात आले असून 6.9 कोटी अनुदान उपलब्ध आहे. दुसऱया लाटेत बेळगाव तालुक्मयात सर्वाधिक 1 लाख 18 हजार 371 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतरचा क्रमांक चिकोडीचा लागतो. येथे 51 हजार 713 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज
कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हय़ातील 24 लाख 25 हजार 386 जणांना लस द्यायची आहे. रोज 15 हजार जणांना लस दिली तर सर्व लाभार्थींना लस देण्यासाठी किमान 161 दिवस लागणार आहेत. पण सध्या रोज सरासरी 7 हजार 970 इतक्मया लसी दिल्या जात आहेत. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे.