महसूलमंत्री आर. अशोक यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून राज्याला अपेक्षित प्रमाणात मदत मिळत असून शनिवारी केंद्र सरकारकडून ब्लॅक फंगसवरील औषधांचे 10 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. आणखी औषधे पाठवून देण्यासंबंधीची विनंती केंदीयमंत्री सदानंदगौडा यांच्यामार्फत केंद्राकडे करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
बेंगळूर येथे शुक्रवारी पत्रकारांशी ते बोलत होते. ब्लॅक फंगसवरील उपचाराच्या औwषधांना देशात मोठी मागणी आहे. याबाबत आरोग्य खाते, लॉजिस्टिक सोसायटी आणि अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी आतापर्यंत 1,050 डोस उपलब्ध झाले आहेत. या औषधांसाठी इस्पितळांनी ऑनलाईनमार्फतच इंडेन्ट भरावे. तेव्हाच तातडीने औषधे पाठवून देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर कोविड चाचण्या कमी केल्याचा आरोप केला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱयांनी प्रत्येक खेडय़ांमध्ये जाऊन कोविड चाचण्या करण्याची सूचना आरोग्य कर्मचाऱयांना दिली आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱया अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची पथके देखील कोविड चाचण्या करण्यासाठी ग्रामीण भागात जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.