पहाटेपासूनच दर्शनासाठी गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी मोठय़ा उत्साहात बेळगाव शहर व तालुक्मयात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी गणेश मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाचे नियम पाळून भाविकांना दर्शन देण्यात येत होते. गणेश मंदिरांमध्ये करण्यात आलेली आकर्षक आरास भाविकांचे मन वेधून घेत होती.
अंगारकी संकष्टीसाठी गणेश मंदिरे सजली होती. विद्यतु रोषणाईने मंदिरे उजळून निघाली होती. सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविक दर्शन घेत होते. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात करण्यात आले नाहीत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत होती.
शहरातील हिंडलगा येथील गणेश मंदिर, चन्नम्मा चौकातील गणेश मंदिर, टिळकवाडी महात्मा गांधी रोड येथील गणेश मंदिर, अनगोळ येथील स्वयंभू गणेश मंदिरासह विविध ठिकाणी मंदिरे भाविकांनी फुलली होती. यामुळे शहर-उपनगरांसोबतच ग्रामीण भागातही भक्तिमय वातावरण दिसून आले.