बेळगाव : कर्नाटक बॉक्सिंग अमॅच्युअर संघटनेतर्फे चौथ्या ज्युनियर महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या भक्ती कोकितकरची कर्नाटक राज्य बॉक्सिंग संघात निवड झाली आहे.
बेंगळूर येथील कंठिरवा स्टेडियम येथे झालेल्या निवड चाचणीत बालिका आदर्श शाळेची उदयोन्मुख बॉक्सर भक्ती मारूती कोकितकरची 44 ते 46 किलो वजनी गटात निवड करण्यात आली. 25 ते 31 जुलै दरम्यान सोनिपत, हरियाणा येथे ज्युनियर राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धा होणार असून, भक्ती कर्नाटक संघातून हरियाणाला रवाना होणार आहे. पिरनवाडीसारख्या ग्रामीण भागात राहून देखील भक्तीने बॉक्सिंग क्षेत्रात लौकीक कमावला आहे. तिला अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे तर मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी, चेअरमन जी. एन. फडके, क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.