भगतचे दुहेरीतही लक्षवेधी यश
नवी दिल्ली
मॅनमा येथे सुरू असलेल्या बहरीन पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पॅरा ऑलिंपिक चॅम्पियन बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने दोन सुवर्णपदके तर तरूण धिल्लॉने एक सुवर्णपदक पटकाविले.
पुरूषांच्या एकेरीत एसएल3 प्रकारातील एकेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डॅनियल बेथेलकडून पुढे चाल मिळाल्याने प्रमोद भगतला सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या एसएल3-एसयू5 अंतिम लढतीत प्रमोद भगत आणि मनिषा रामदास यांनी थायलंडच्या टिमेरॉन आणि निपाडा यांचा 21-14, 21-11 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले.
पुरूषांच्या एसएल4 एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या तरूण धिल्लॉने सुवर्णपदक मिळविताना कोरियाच्या शिन हेवानचा 21-9, 21-9 असा पराभव केला. महिला एकेरीच्या एसएल3 प्रकारात भारताच्या मनदीप कौरने रौप्य मिळविले.