दोडामार्ग – वार्ताहर-
माटणे येथील युवा भजनी कलाकार गणेश नागेश शिरोडकर यांना आदर्श युवा महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न 2022 हा राज्यस्तरीय पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई या संस्थेद्वारे नुकताच जाहीर झाला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील 34 वर्षीय गणेश शिरोडकर यांनी भजन कलेमध्ये आपल्या आवाजाच्या जोरावर जिल्ह्यामध्ये नाव केले आहे. जिल्ह्यातील अनेक भजन स्पर्धेत श्री. शिरोडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने प्रथम पारितोषिके, उल्लेखनीय बक्षिसे पटकावली आहेत. त्यांच्या या भजन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊनच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई या संस्थेने शिरोडकर यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.