ओटवणे / प्रतिनिधी-
मूळचे ओवळीये वरचीवाडी येथील आणि नोकरीनिमित्त मुंबई पवई येथे राहणारे प्रसिद्ध भजनी व डबलबारी बुवा रमेश नारायण परब (६०) यांचे गुरुवारी १० जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले. पवईतील कोकण सेवा संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच पासपोली येथील गावदेवी प्प्रासादिक भजन मंडळाचे ते मुख्य बुवा होते. निष्ठावंत शिवसैनिक असलेले रमेश परब हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या बोर्ड सिक्युरिटी सुपरवायझर पदावरून निवृत्त झाले होते. भजन व डबलबारीतील गुरु भगवान लोकरे बुवा यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले होते. माडखोल धवडकी येथील निलमणी पॅलेस चायनीज कॉर्नरचे रुपेश परब यांचे ते वडील होत तर मुंबई येथील संजय परब यांचे ते भाऊ होत.