गांधीनगर परिसरातील घटना
प्रतिनिधी \ बेळगाव
भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात चार लहान मुले जखमी झाली आहेत. बुधवारी दुपारी गांधीनगर येथील मंनत कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. यापैकी एका मुलावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
घरासमोर खेळणाऱया मुलांवर भटक्मया कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. फैजान (वय 7), शहानवाज (वय 4), आदीबा (वय 11) यांच्यासह चार मुले कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली.
फैजानच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. तर उर्वरित मुलांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. महानगरपालिकेने भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अशा घटना वाढल्या आहेत.