काही पिल्ले जखमी तर काही बेपत्ता : बेनकनहळ्ळीत घटनेने भीती, नुकसानभरपाईची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथे कुत्र्यांनी 12 बकऱयांच्या पिल्लांचा फडशा पाडला आणि इतर बकऱयांना जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे धनगर समाजातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बेनकनहळ्ळीच नव्हे तर अनेक ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात भटक्मया कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मल्लाप्पा नरोटी, यल्लाप्पा नरोटी व यल्लाप्पा उचगावकर यांच्या मालकीच्या बकऱयांचा फडशा भटक्मया कुत्र्यांनी पाडला आहे. सुमारे वीस भटक्मया कुत्र्यांच्या कळपाने बकऱयांवर झडप घातली. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र या घटनांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत तातडीने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे 12 पिल्लांना ठार केले असून बाकीची काही किरकोळ जखमी झाली आहेत. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सुमारे 7 ते 8 पिल्ले घाबरून बेपत्ता झाली आहेत.
नेहमीप्रमाणे दिवसभर बकऱयांना चारवून रात्री वस्तीला शेतातील जाळय़ामध्ये घालून मेंढपाळ स्वयंपाक तयार करण्यासाठी पाणी आणावयास गेले होते. अचानक सुमारे वीस भटक्या कुत्र्यांच्या कळपाने झडप घालून मिळेल त्या बकऱयावर हल्ला करून सुमारे 12 पिल्ले मारली आहेत. तर काही पिल्ले जखमी झाली आहेत. काही बकरी बेनकनहळ्ळीच्या गावात शिरल्याने ग्रामस्थांनी मेंढपाळांना फोन करून कळविले. लागलीच गावातील मेंढपाळ व काही युवकांनी घटनास्थळी येऊन त्या बकऱयांना पुन्हा जाळय़ात घालून सावरले.
मेंढपाळ आपल्या बकऱयांना पोटच्या मुलापेक्षाही अधिक काळजी घेऊन जपतात. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत मोठी हानी झाली आहे. यावेळी घटनास्थळी ग्राम पंचायत सदस्य भागाण्णा नरोटी, परशराम सुळगेकर व ग्रामस्थांनी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा करून मेंढपाळांना नुकसानभरपाई मिळवून देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली.