राष्ट्रीय श्वान दिन : रॉबिन सिंहचे कौतुकास्पद कार्य
भारतात श्वानांना ‘स्टेट्स सिम्बॉल’ म्हणून पाहिले जाते. बहुतांश लोक विदेशी प्रजातीचे श्वान पाळतात. अमेरिका, जर्मनीसह अनेक देशांमधून श्वान भारतात आयात केले जातात, त्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील रॉबिन सिंह यांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. रॉबिन यांनी आतापर्यंत 100 हून अधिक भटक्या श्वानांना अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फिनलंड, इस्रायलसह अनेक देशांमध्ये पाठविले आहे, त्यांना प्राण्यांचा ‘रॉबिनहुड’ म्हटले जाते.
2003 साली रॉबिन यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली, काही वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची जीवन स्थिरसावरही झाले, पण तरीही ते फारसे आनंदी नव्हते. अमेरिकेत त्यांचे मन लागत होते. ऑगस्ट 2012 मध्ये रॉबिन भारतात परतले आणि त्यांनी देशातील विविध शहरांना भेट देण्यास सुरुवात केली.
वृद्ध महिलेने बदलले जीवन
तामिळनाडूच्या ऑरोविलेमध्ये त्यांची 60 वर्षीय महिला लोरेन यांच्याशी भेट झाली. लोरेन यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती, तरीही त्यांच्याकडे 50 हून अधिक भटके श्वान होते, त्यांची देखरेख त्याच करायच्या. लोरेन हॉटेल्समधील उरलेले अन्न गोळा करून श्वानांचे पोट भरत होत्या. रॉबिन यांनी लोरेन यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
व्यापक कार्याचा निर्णय
2013 मध्ये रॉबिन यांनी व्यापक स्तरावर हे काम करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये त्यांनी स्ट्रीट डॉग स्टरलायजेशन हा कार्यक्रम सुरू केला. 2014 मध्ये हिमाचलमध्ये पीपल फार्म नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. गरजू प्राण्यांना मदत करण्याचे काम ते यातून करतात. रॉबिन याकरता एक हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला. यांतर्गत लोक जखमी श्वान आणि अन्य प्राण्यांची माहिती संस्थेला देता. रॉबिन यांची टीम संबंधित प्राण्याला वाचविण्याचे काम करतात. संस्थने आतापर्यंत 3 हजारांहून अधिक प्राण्यांना वाचविले आहे.