घातपात झाल्याचा स्थानिक नागरिकांकडून संशय व्यक्त
प्रतिनिधी /मोरजी
पेडणे तालुक्मयातील भटवाडी-कोरगाव येथील डोंगराळ भागात आज सकाळी एका रशियन नागरिकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला
दरम्यान, काही महिला चुरणा काढण्यासाठी डोंगरावर गेली होती त्यावेळी त्यांना हा मृतदेह दृष्टीस पडला. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सदर मृतदेह रशियन नागरिकांचा असून त्याचे नाव व्हीताली ऍलिक्सिसिस वय (40) असल्याची माहिती पेडणे पोलिसांनी दिली. सदर हा रशियन नागरिक भटवाडी कोरगाव येथे राहत होता. घर मालक आणि त्याच्या रशियन मित्राने मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास पेडणे पोलीस करत आहेत.