प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील भडगाव-खोंडे-जोगळेवाडी येथील तरूणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
परेश प्रकाश शिगवण (30) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामावर निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याची पत्नी अंजली शिगवण ही घराच्या मागील बाजुस चुल पेटवण्यासाठी गेली असता त्याने साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत चाकाळेचे पोलीस पाटील विकास वाडकर यांनी पोलीस स्थानकात खबर दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.