भारतीय तटरक्षक दल
भारतीय तटरक्षक दलाला यांत्रिक पदांवर योग्य उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता इच्छुकांनी आपला अर्ज 22 मार्च 2020 पूर्वी दाखल करायचा आहे.
एकूण: 37 जागा
पदाचे नाव: यांत्रिक 02/2020 बॅच
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण, 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. (एससी, एसटी/खेळाडू: 55 टक्के गुण)
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 1 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा) (इतरांना सवलत)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
शुल्क: फी नाही.
प्रवेशपत्र: 9 ते 16 एप्रिल 2020
परीक्षा: एप्रिल 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2020 या तारखेच्या आत इच्छुकांनी अर्ज दाखल करायचा आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.joinindiancoastguard.gov.in
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 182 जागांसाठी भरती केली जाणार आहे. याकरीता इच्छुकांचे अर्ज 6 मार्च 2020 या तारखेच्या आत दाखल व्हायला हवेत.
एकूण: 182 जागा
पद पद संख्या
1.टेक्नीशियन-बी 102
2.ड्राफ्ट्समन-बी 3
3.टेक्नीकल असिस्टंट 41
4.लायब्ररी असिस्टंट 4
5.सायंटिफिक असिस्टंट 7
6.हिंदी टायपिस्ट 2
7.कॅटरिंग अटेंडंट- ए 5
8.कुक 5
9.फायरमन-ए 4
10.हलके वाहन चालक ए 4
11.अवजड वाहन चालक ए 5
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण व संबंधित टेडमध्ये आयटीआय/एनटीसी/एनएसी
पद क्र.2: 10 वी उत्तीर्ण, आयटीआय/एनटीसी/एनएसी (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल)
पद क्र.3: संबंधित इंजिनिअरिंग विषयातील प्रथम श्रेणी डिप्लोमा.
पद क्र.4: ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी व प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: प्रथम श्रेणी बीएससी (रसायनशास्त्र/भौतिकशास्त्र/अŸनिमेशन आणि मल्टीमीडिया/इलेक्ट्रॉनिक्स)
पद क्र.6: कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/संगणक अनुप्रयोग प्रथम श्रेणीसह पदवीधर व संगणकावर हिंदी टाइपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण
पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण तसेच 5 वर्षे अनुभव
पद क्र.9: 10 वी उत्तीर्ण
पद क्र.10: 10 वी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना व 3 वर्षे अनुभव
पद क्र.11: 10 वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना व 5 वर्षे अनुभव
वयाची अट: 6 मार्च 2020 रोजी, (एससी, एसटी: 5 वर्षे सूट, ओबीसी: 3 वर्षे सूट)
पद क्र.1 ते 5, 8, 10 आणि 11: 18 ते 35 वर्षे
पद क्र.6 आणि 7: 18 ते 26 वर्षे
पद क्र.9: 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण: बंगळूर
शुल्क: सामान्य, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्टय़ा मागास- रु.250 (एसी, एसटी, इडब्ल्यूएस, एक्सएसएम, पीडब्ल्यूडी, महिला- फी नाही)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मार्च 2020 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.isro.gov.in
सीमा सुरक्षा दल
सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांची भरती केली जाणार आहे. याकरीता उमेदवारांना आपला अर्ज 16 मार्च 2020 पर्यंत दाखल करता येणार आहे.
एकूण: 317 जागा
पद पद संख्या
1.सब इन्स्पेक्टर (मास्टर) 5
2.सब इन्स्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) 9
3.सब इन्स्पेक्टर (वर्क शॉप) 3
4.हेड कॉन्स्टेबल (मास्टर) 56
5.हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) 68
6.हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) 16
7.कॉन्स्टेबल टेड्समन (क्रू) 160
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12 वी उत्तीर्ण व द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण व प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4: 10 वी उत्तीर्ण व सेरंग प्रमाणपत्र
पद क्र.5: 10 वी उत्तीर्ण द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
पद क्र.6: 10 वी उत्तीर्ण व आयटीआय(मोटार मेकॅनिक/मेकॅनिस्ट/कार्पेंटर/इलेक्ट्रीशियन/एसी टेक्नीशियन/इलेक्ट्रॉनिक्स/प्लंबर)
पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण व 1 वर्ष अनुभव
वयाची अट: 16 मार्च 2020 रोजी, (एससी/एसटी : 5 वर्षे सूट, इतर मागासवर्ग: 3 वर्षे सूट)
पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे
पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क:
पद क्र.1 आणि 2: सामान्य, ओबीसी रु.200
पद क्र.3 ते 7: सामान्य, ओबीसी रु.100
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जवळील केंद्र.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 16 मार्च 2020 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.bsf.nic.in