प्रतिनिधी / बेळगाव
जानकीबाई नावगेकर, देसाई भरतेश पीयु कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ऍण्ड सायन्सतर्फे जिमखाना उद्घाटन व नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत असा कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य सोसायटीचे मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल दीपककुमार गुरुंग उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, नि÷ा, सचोटी, स्वप्ने, प्रामाणिकपणा हे यशाचे खांब आहेत. युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी हे गुण वाढवावेत, प्रत्येक व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतात. संवाद कौशल्य वेळेचे व्यवस्थापन व सांघिकता या गुणांची प्रत्येकाने जोपासना करावी.
याप्रसंगी मानसी बडस्कर हिची विद्यार्थी प्रतिनिधी व मानसी पाटील हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. नूतन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वैष्णवी परमोजी ही मिस फ्रेशर व दयानंद हावळ याची मिस्टर फ्रेशर म्हणून निवड झाली. युजी व पीजी विभागात स्वाती शहापूरकर हिची मिस फ्रेशर म्हणून व निलेश पाटील याची मिस्टर फ्रेशर म्हणून निवड झाली.
कॉलेज कार्यकारी मंडळाचे चेअरमन महावीर उपाध्ये यांनी अध्यक्षीय समारोप करताना नवीन क्षितिजे निर्माण करा, असे आवाहन केले. याप्रसंगी सदस्य जितेश कब्बूर, शालिनी चौगुले, एस. डी. शिरगुप्पे उपस्थित होते. प्राचार्या सुनीता देशपांडे यांनी स्वागत केले. नीता गंगरेड्डी यांनी परिचय करून दिला. मानसी बडस्कर व श्रीदेवी बेटगेरी यांनी सूत्रसंचालन केले. साक्षी देमाणाचे यांनी आभार मानले.