प्रतिनिधी/ कराड
पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून ऑगस्ट 2015 मधे मलकापूर येथे एकाचा खून झाला होता. या खटल्याची सुनावणी कराडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी आरोपी बाळू ऊर्फ पांडूरंग दादासाहेब पाटील (वय 52, रा. कटपान मळा, कापील, ता. कराड) यास जन्मठेप व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकारी वकील आर. सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापील येथील बाळू पाटील याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. दरम्यान 13 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी तो मलकापूर येथील श्री. गजानन नागरी पतसंस्थेजवळ बाळू पाटील आला. तेथे सुरेश पांडुरंग जाधव (वय 40, रा. कटपान मळा, कापील) हा दिसला. पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपी बाळू याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने सुरेश पांडुरंग जाधव यास भरवस्तीत लोखंडी सुरी व कोयता या हत्याराने डोक्यात, कपाळावर, पाठीवर वार करुन त्याचा खून केला होता. याप्रकरणी फिर्याद रोहित दिलीप जाधव (वय 20, कापील) याने शहर पोलीस स्टेशनला दिली होती. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी केला होता. आरोपीच्या विरोधात
न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकारी वकील आर. सी. शहा यांनी सोळा साक्षीदार तपासले. सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून 27 एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाने आरोपी बाळू ऊर्फ पांडुरंग दादासाहेब पाटील यास खुनाच्या आरोपाखाली दोषी घरुन जन्मठेपेची शिक्षा 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरलेस 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
आर. सी. शहा यांचा युक्तिवाद ग्राह्य
सरकारी वकील आर. सी. शहा यांनी न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने काम पाहिले. सरकारी वकिलांनी 16 साक्षीदार तपासत जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून शिक्षा सुनावली. गेल्या आठ दिवसात सरकारी वकील आर. सी. शहा यांनी पाहिलेल्या खटल्यात ही दुसरी जन्मठेप आहे.