उतारवयातही तरुणाईचा उत्साह : व्हायर व्हिडीओने नेटकरी थक्क
बाईकवर स्टंट करणे धोकादायक ठरू शकते. पण तरीही, इंटरनेटवर तरुणांचे अनेक व्हिडीओ येत असतात. आता मात्र एका आजोबांच्या बाईकवरील ‘बल्ले-बल्ले’ने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकतीच, अशी एक क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली गेली असून त्यात एक आजोबा स्प्लेंडर बाईकवर आश्चर्यकारक हालचाली करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून लोकांची तोंडे उघडीच राहिली आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबा स्प्लेंडर पांढऱया कुर्ता-पायजामात आणि गळय़ात शाल गुंडाळून मोटरसायकल चालवताना दिसत आहेत. त्यांची बाईक चालवण्याची स्टाईल खूपच विचित्र आहे. चालत्या बाईकचे हँडल सोडून ते बल्ले-बल्ले स्टाईलमध्ये दोन्ही हात हवेत उंच करून सीटवर वारंवार उठताना दिसतात. शेवटी ते बाईकच्या सीटवर झोपतातही. मात्र, बाईकस्वारांनी आणि शौकिनांनी अशी स्टंटबाजी करताना सावधगिरी बाळगण्याच्या कमेंट्स केल्या जात आहेत.