सावरवाड येथील घटना
सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सांगेली सावरवाड येथे रविवारी सकाळी दोन बिबट्यांचे दर्शन झाले. बिबट्यांच्या वावरामुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात प्रथमच बिबट्यांचे दर्शन झाले आहे. सह्याद्री पट्ट्यात ब्लॅक पॅंथर यापूर्वी वास्तव्यास होता, त्यानंतर बिबट्यांचा वावर ही सुरू झाला होता. आता भर वस्तीत बिबटे येऊ लागले आहेत. एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने या भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सावरवाड येथील शुभांगी कुडतरकर पोल्ट्री फार्म परिसरात बिबट्यांचे दर्शन झाले आहे, माजी पंचायत समिती सभापती व जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी बिबट्यांच्या या वास्तvयाबाबत वनविभागाचे प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधले आहे. सदरचा भाग आंबोली वनक्षेत्रात येत आहे, त्यामुळे तेथील वन कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन बिबट्यांचा या वस्तीतील वापरावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.