साहित्य : भजी बनविण्यासाठी 12 हिरव्या मिरच्या, सारणासाठीः 1 वाटी किसलेलं पनीर, दीड चमचा आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा आमचूर पावडर, चिमुटभर हळद पावडर, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, बॅटरसाठीः अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद पावडर, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा कोमट तेल, चवीपुरते मीठ, तेल तळण्यासाठी
कृती : प्रथम मिरच्यांना मधोमध उभा छेद द्यावा. सारणासाठी दिलेले साहित्य बाऊलमध्ये मिक्स करून घ्यावे. त्याचे समान बारा भाग करावेत. दुसऱया बाऊलमध्ये बॅटरसाठी दिलेले साहित्य मिक्स करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्याच्या पीठाप्रमाणे बॅटर बनवावे. आता उभा छेद दिलेल्या मिरच्यांमध्ये सारण भरावे. बॅटरमध्ये चांगले घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढाव्यात. आता तयार भरवा पनीर सॉससोबत खाण्यास द्या.
टीप : शक्यतो मिरची भजी बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱया मिरच्या वापराव्यात.