ऑनलाईन टीम / टोकियो :
पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणारी भारताची तलवारबाज भवानी देवी पहिल्या फेरीतील विजयानंतर दुसऱ्या फेरीत पराभूत झाली. भवानी देवीने पहिल्या फेरीत टय़ुनिशियाच्या नादीया आझिझीवर 15-3 असा दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या फ्रान्सच्या मॅनन बुनेटने भवानीवर 15-7 असा विजय मिळवला.