ऑनलाइन टीम / मुंबई
मनसेचे पहिलं महाधिवेशन मुंबईत होणार आहे. मनसेच्या झेंडय़ात बदल करण्यात आला आहे. तसाच तो धोरणांमध्येही होईल अशीही चर्चा आहे. या सगळ्यात आता बाळा नांदगावकर यांनी एक वक्तव्य सूचक केले आहे. ते म्हणाले, भविष्यात मनसे भाजपसोबतही जाऊ शकते.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, यापूर्वी आम्ही शिवसेनेला मदत केली, तसंच भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीलाही मदत केली. आम्हाला कोणी मदत केली ते सगळय़ांना माहित आहेच. त्यामुळे भविष्यात कुणासोबत जायचं हा निर्णय राज ठाकरे घेतील. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, त्यामुळे लोकांच्या मनात आहे ते घडनाता दिसतं आहे.
दरम्यान, शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे घडलं. त्यामुळे भाजपालाही राज्यात प्रादेशिक पक्षाची गरज लागणार आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर मनसे-भाजपा एकमेकांच्या जवळ येऊ शकतात असं सांगितलं जात आहे.