खजान्याची चावी (भाग 2)
5.1.2022 ते 11.1.22 पर्यंत
नमस्कार मागच्या आठवडय़ात सांगितल्याप्रमाणे तुम्ही केले असेलच. एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ.
4 6 6 7 8 91 2 3
अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग आर्द्रा पुनर्वसु, पुष्य आश्लेषा
माघ पू.फाल्गुनी उ. फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्ये÷ा
मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनि÷ा शततारका पू. भाद्रपदा उ. भाद्रपदा रेवती
समजा, तुमचे जन्मनक्षत्र पुनर्वसु किंवा विशाखा किंवा पू. भाद्रपदा यापैकी एक आहे. म्हणून तुम्ही त्या कॉलमच्या वरच्या गोलात ‘1’ लिहिले. नंतर उजवीकडून क्रमाने 2 ते 9 आकडे प्रत्येक कॉलमच्या वरच्या गोलात लिहिले. (कृपया आकृती पहा) ही तयार झाली तुमची स्वतःची, अगदी वैयक्तिक अशी सुखी जीवनाच्या खजान्याची चावी. अशी चावी तुमच्या घरातील प्रत्येक क्यक्तीसाठी तयार करू शकता. जिच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसाठीही करायला हरकत नाही!
आता कॅलेंडर तयार असेलच! लक्षात घ्या की त्या कॅलेंडरमध्ये इंग्रजी तारखेबरोबर ‘नक्षत्राचे नाव’ सुद्धा हवे. इथे आपले 90 टक्के काम फत्ते झाले आहे. कुठलेही काम कधी करावे किंवा करू नये हे समजणे आता ‘बच्चोंका खेल’ आहे!
आता अर्थ समजून घेऊया.जिथे 2 लिहिले आहे ती नक्षत्रे म्हणजे ‘संपत’ (शुभ), 3 लिहिले आहे ती नक्षत्रे म्हणजे ‘विपत’ (अशुभ) 4-क्षेम (शुभ), 5- प्रत्ययी (अशुभ) 6- साधक (शुभ) 6-वध (अशुभ) 8- मैत्री (शुभ) 9-आधि मैत्री (शुभ)
आता तुम्हाला कळले की कोणती नक्षत्रे तुमच्यासाठी शुभ आहेत आणि कोणती नक्षत्रे अशुभ आहेत. शेवटचे काम म्हणजे कॅलेंडर उघडायचे आणि प्रत्येक तारखेजवळ कुठले नक्षत्र आहे ते पाहायचे. जर ते नक्षत्र तुमच्यासाठी शुभ असेल तर बरोबर चिन्ह लिहायचे आणि अशुभ असेल तर गुणूले खूण करायची. असे प्रत्येक महिन्याचे केले की पूर्ण वर्षाचे नियोजन झाले.
लग्न असो की जागेची खरेदी विक्री, फर्निचर घेणे असो की, वाहन खरेदी, महत्त्वाची सगळी कामे तुमच्या पर्सनल शुभ तारखेलाच करायची आणि अशुभ तारीख टाळायची. सोपे आहे ना?
‘तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ सर्व दिशा’ जरी असले तरी आपण काही संत नाही आणि नक्षत्रांची मदत घेण्यात गैर नाही! शुभं भवतु!
महाउपायः कोणी अकारण त्रास देत असल्यास भैरव मंदिरात, मातीच्या दिव्यात 2 लवंगा, मोहरीचे तेल, काळय़ा दोऱयाची वात घालून क्यक्तीच्या नावासह तो दिवा लावावा (8 शनिवार)
सोपी वस्तू टीपः वायव्येला काहींही लटकत ठेऊ नये.
मेष
तब्येतीकडे लक्ष द्या. बेधडक स्वभावाला आवर घाला. प्रवासाचे योग. जमीन- वाहन खरेदी विक्री टाळा. प्रेमप्रसंगात यश, शत्रूंमध्ये वाढ, वैवाहिक सुख उत्तम. अचानक धनप्राप्ती. नोकरी व्यवसारात वादाचे प्रसंग. लाभ कमी पण कष्ट जास्त.
उपाय/उपासना- गणेश मंदिरात तुपचा दिवा लावा, सावध रहा- शुक्रवार, शुभ अंक- 6, शुभ रंग-क्रीम.
वृषभ
इच्छापूर्तीचा काळ. कौटुंबिक सुख उत्तम. प्रवास टाळा. जमीन व्यवहारात यश. शेअर्समध्ये फायदा. मनोरंजनाकडे कल. नोकरीत प्रमोशन, जोडीदाराबरोबर वाद, पण ऐनवेळी जोडीदाराचीच मदत मिळेल. भाग्याची साथ कमी आहे. धोका पत्करू नका.
उपाय / उपासना- गरजू विद्यार्थ्यांला शैक्षणिक साहित्य द्या, सावध रहा- गुरुवार, शुभ अंक- 8, शुभ रंग- पांढरा.
मिथुन
आजारातून सुटका होईल. कटू बोलणे टाळा. धनासंबंधी चिंता जाणवेल. लेखकांना संधी मिळतील.वाहन खरेदीचे योग. संतती सुख उत्तम. गुप्तशत्रूंंच्या कारवाया वाढतील. वैवाहिक जीवनात मतभेद. वाहन जपून चालवा. कागदपत्रे सांभाळून ठेवा.
उपाय/उपासना- गाईला चारा घाला. सावध रहा- गुरुवार, शुभ अंक- 3, शुभ रंग- हिरवा.
कर्क
तब्येतीच्या तक्रारी येतील. कुपथ्य टाळा. वाणीचा प्रभाव पडेल. प्रवासातून फायदा होईल. प्रॉपर्टी संबंधी सुवार्ता. प्रेमींसाठी आनंदाचा काळ. शत्रू नमोहरम होतील. वैवाहिक जोडीदाराचे मन सांभाळा. दूरचे प्रवास टाळा. कामे होण्याकरता आटापिटा करावा लागेल.
उपाय/ उपासना- चंद्राला दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, सावध रहा- शनिवार, शुभ अंक- 5, शुभ रंग- क्रीम.
सिंह
संकल्प तडीला जातील. धन प्राप्तीचे उत्तम योग. धाकटय़ा भावंडांची साथ मिळेल. आईच्या तब्येतीला जपा. धोका असलेली गुंतवणूक टाळा. नोकरीमध्ये मनस्ताप, वैवाहिक जीवनात कुरबूर, शनिवारी प्रवास टाळा. यशाकरता जास्त प्रयत्न करावे लागतील.
उपाय/ उपासना- गवंडी काम करणाऱयांना दूध वाटा. सावध रहा-सामेवार, शुभ अंक- 5, शुभ रंग- लाल.
कन्या
इच्छापूर्तीचा काळ आहे. तब्येत उत्तम राहील. विविध मार्गांनी पैसा येईल. पारिवारिक सुख उत्तम. प्रवास घडतील. नवीन ओळखीमुळे लाभ होईल. मित्राकडून अपेक्षाभंग होईल. नोकरदारांनी मर्जी राखावी.
उपाय/ उपासना- निळी फुले नाल्यात टाका, सावध रहा- बुधवार, शुभ अंक- 4, शुभ रंग- निळा.
तुळ
जुने मित्र भेटतील. तब्येतीची तक्रार कमी होईल. व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. धनप्राप्ती उत्तम. सोमवारी प्रवास टाळा. घरात दुरुस्तीवर पैसा खर्च होईल. प्रेमसंबंधात सावध रहा. नोकरीतील वातावरण चांगले असेल. बेरोजगारांना नोकरी मिळेल.
उपाय/ उपासना- देवीला कुंकुमार्चन करा. सावध रहा- मंगळवार, शुभ अंक- 3, शुभ रंग- हिरवा.
वृश्चिक
आनंदाची बातमी कळेल. नवविवाहितांना अनुकूल काळ. तब्येत उत्तम राहील. पैशांची तंगी जाणवेल. कुणाचेही मन दुखवू नका. प्रवास टाळा. अचानक धन प्राप्तीचे योग. वैवाहिक जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. समाजात मानसन्मान मिळेल.
उपाय/उपासना-मारुतीच्या खांद्यावरचा शेंदूर जवळ ठेवा, सावध रहा- रविवार, शुभ अंक- 9, शुभ रंग-तांबूस.
धनु
कोणालाही कसलेही वचन देणे महागात पडू शकते. पुर्वी केलेल्या खर्चामुळे आर्थिक तंगी. तब्येत नाजूक राहील. घरातील ज्ये÷ व्यक्तीला त्रास. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती. जोडीदाराच्या मदतीमुळे कठीण प्रसंग टळेल. मानसन्मानात वृद्धी
उपाय/ उपासना- वृद्ध व्यक्तीला अन्न दान करा, सावध रहा- मंगळवार, शुभ अंक- 1, शुभ रंग- सोनेरी
मकर
कुपथ्यामुळे पोटाचे त्रास होतील. कौटुंबिक वाद. विद्यार्थ्यांना यश. प्रेमींना काळ चांगला आहे. पुर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ. प्रवासात कटू अनुभव येईल. नशीबाची साथ आहे. मानसन्मानाचे योग. घेतलेल्या कामात यश येईल.
उपाय/ उपासना- हनुमान चाळीसा पठण करा, सावध रहा- गुरुवार, शुभ अंक- 7, शुभ रंग- करडा
कुंभ
मित्रपरिवाराबरोबर आनंद लुटाल. आपले निर्णय दुसऱयांवर लादू नका.पैसे वाचवण्याकडे भर द्या. नोकरदारांना चांगले दिवस. पुर्वी हुकलेल्या संधी मिळतील. व्यावसायिकांच्या योजना यशस्वी होतील. सगळय़ा प्रकारचा लाभ होईल.
उपाय/ उपासना- रुईच्या पानावर राम लिहून माळ करून हनुमानाला घाला. सावध रहा- रविवार, शुभ अंक- 8, शुभ रंग- काळा.
मीन
आत्मविश्वासात वाढ होईल. काम वाढल्याने दमछाक होईल. इच्छित वस्तूची प्राप्ती होईल. मध्यस्थीचे काम करणाऱयांना चांगले कमिशन मिळेल. जागेचे व्यवहार पूर्ण होतील. जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. भाग्याची उत्तम साथ आहे.
उपाय/उपासना- गरजू सुरक्षाकर्मीला लाल वस्त्र द्या, सावध रहा- शनिवार, शुभ अंक-4, शुभ रंग- केसरी