जय आत्माराम! जय श्रीराम!!
नमस्कार, पहिल्यांदा ‘जय’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. जय म्हणजे जिंकणे. पण कशा विरुद्ध? तर आपल्यातल्या दुर्गुणांविरुद्ध त्या देवतेच्या सगुणांचा विजय होऊ दे. म्हणजे जेव्हा आपण जय श्रीराम म्हणतो त्यावेळेला आपल्यातल्या दुर्गुणांवरती श्रीरामाच्या सद्गुणांचा विजय होऊ दे असे आपल्याला म्हणायचे असते. पण आपण खरोखर या अर्थाने म्हणतो का? निराकार निर्गुण ईश्वराला कोटय़वधी सगुण रूपानी ज्या धर्मात जन्म घ्यावा असा वाटला तो आपला धर्म. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी व्रती अशा रामाच्या स्वरूपाने जेव्हा त्या निर्गुणाने आपला अवतार घेतला तेव्हा कोटय़वधी वर्षांकरता जनमानसात तसा प्रभाव उत्पन्न झाला. आपण रामाची पूजा करतो. रामनवमी साजरी करतो. पण रामा सारखे वागतो का? आपल्या आई वडिलांना किंमत न देता रामाची पूजा करण्यात किंवा परस्त्रीकडे वाईट नजरेने बघून जय श्रीराम म्हणणे आपल्याला शोभते का याचा विचार आपण जरूर करावा. रामनवमी निमित्त काही प्रयोग सांगत आहे जे गुरुकृपेने तुम्हा सगळय़ांच्या समोर ठेवत आहे. याकरता लागणारे साहित्य-हवन सामग्री. यात चंदन पावडर, सातू, देशी तूप, अगर, तगर, भीमसेनी कापूर, पंच मेवा आणि तांदूळ. खाली दिलेले समर्थ रामदासस्वामींचे जे श्लोक आहेत किंवा रामचरितमानसमधल्या चौपाया आहेत त्या 108 या संख्येने वरील सामग्री एकत्र करून गाईच्या शेणीवरती हवन करायच्या आहेत.
मनाच्या अति चंचलतेकरता आणि एकाग्र न करता येण्याच्या समस्या करताः चपळ पण मनाचे मोडता मोडवेना। सकळ स्वजन माया सोडता सोडवेना ।
मानसिक दुर्बलतेकरता, डिप्रेशन करता ः
जळत हृदय माझे जन्म कोटय़ानुकोटी। मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी?
संकट नाशा करता- राजीव नयन धरे धनु सायक। भगत बिपती भंजन सुखदायक?
रोग नाशा करता-
दैविक दैविक भौतिक तापा। राम राज कही नही व्यापा
सगळे आपल्यावर प्रेम करावेत याकरता-
सब नर करही परस्पर प्रीती। चल रही स्वधर्म नरत श्रुती नीती?
नोकरी प्राप्ती किंवा व्यवसाय वृद्धीकरता-
विश्व भरण पोषण कर जाई। ताकर नाम भरत जस होई?
महा उपाय घरात नेहमी अशांती असते, वादावादी होते, एकमेकांविषयी तिरस्काराची भावना होते, गैरसमज असतात, वाईट स्वप्ने पडतात, झोप येत नाही, याकरता दर अमावास्येला सूर्यास्तानंतर रात्री कणकेचा दिवा करून त्यात खोबरेल तेल घालून वात घालून तो दिवा किचनच्या किंवा बाथरूमच्या कट्टय़ावरती लावा. दुसऱया दिवशी तो कणकेचा दिवा कचऱयात टाकून द्यावा. यामुळे घरातले वातावरण प्रसन्न होण्यास मदत मिळते.
सोपी वास्तू टीप अविवाहित मुलींनी घराच्या वायव्य दिशेला झोपावे. अविवाहित मुलांनी घराच्या आग्नेय दिशेला झोपावे.
मेष
लहान-मोठय़ा ताणाचा परिणाम तब्येतीवर होऊ शकतो. परिवारातील वातावरण संतुलित राखण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. शक्मयतो प्रवास टाळा. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. छोटय़ा गुंतवणुकीकरता अनुकूल कालावधी आहे. वैवाहिक सौख्य उत्तम असेल. भाग्याची साथ आहे. मानसन्मान मिळेल. उपाय -महालक्ष्मीला कुंकूमार्चन करा.
वृषभ
घाईगडबडीत निर्णय घेतल्यामुळे नुकसान होऊ शकते. तब्येतीला जपावे लागेल. धन प्राप्तीकरता अधिक कष्ट करावे लागतील. छोटय़ा प्रवासाचे योग आहेत. धोकादायक गुंतवणूक टाळावी. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. वाहन जपून चालवा. धार्मिक गोष्टींकरता प्रवास घडेल. उपाय तहानलेल्या वाट शोरूम करता पाण्याची सोय करा
मिथुन
धनप्राप्तीचे उत्तम योग बनत आहेत. परिवारातील वातावरण आनंदी असेल. एखाद्या नातेवाईकाची मदत मिळू शकते. प्रवास लाभदायक ठरेल. घराकरता खर्च होईल. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभ आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. जोडीदाराची साथ मिळेल. कामाचे कौतुक होईल.
उपाय शुक्रवारी देवीची ओटी भरावी.
कर्क
तब्येतीच्या तक्रारी दूर असल्याने समाधान वाटेल. जुनी येणी वसूल होतील. परिवारात मंगल कार्य घडू शकते. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. करमणुकीकडे कल असेल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. भाग्याची साथ मिळेल. दुरून शुभ सूचना मिळू शकतात. उपाय -सोमवारी पांढऱया मिठाईचे दान कामगार वर्गाला करावे
सिंह
आत्मविश्वासात वाढ होईल. कामांना गती मिळेल. परिवारात वाद होऊ शकतात. धनप्राप्तीकरता अधिक कष्ट करावे लागतील. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. आईचा सल्ला उपयोगी ठरेल. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला प्रमोशनच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल. उपाय -कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला.
कन्या
तब्येतीला विशेष करून जपावे लागेल. हवामानाचे बदल तब्येतीवर परिणाम करू शकतात. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. घरातील सदस्यांचा सहयोग मिळेल. प्रवास होईल. वाहन खरेदीचे योग आहेत. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून लाभ. गुप्त शत्रूंच्या कारवाया थंड पडतील. वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे ऐकावे लागेल. लाभाचे उत्तम योग आहेत. उपाय- लहान मुलींना काजळ भेट द्यावे
तूळ
स्वतःच्या कार्यक्षमतेवरती असलेला विश्वास वाढेल. तब्येतीची साथ मिळेल. धनप्राप्तीचे उत्तम योग आहेत. प्रवासातून फायदा होईल. लहान भावंडाचे सहकार्य मिळेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेम प्रकरणात त्रास होऊ शकतो. धोकादायक गुंतवणूक टाळावी. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग घडू शकतात. कामाचे कौतुक होईल. उपाय- केळीच्या झाडाची पूजा करावी
वृश्चिक
आरोग्य सुधारल्यामुळे समाधानी असाल. अनपेक्षितपणे नव्या संधी मिळतील आणि त्यातून आर्थिक लाभ होईल. कुटुंबात एखादा छोटेखानी समारंभ होऊ शकतो. परिवारातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कामानिमित्त घडलेल्या प्रवासातून फायदा होईल. लेखी व्यवहारात यश मिळेल. आईशी वाद संभवतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. समाजात मानसन्मान प्राप्त होईल. उपाय -गरजू सुयोग्य व्यक्तीला चपला दान कराव्या.
धनु
स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य प्राप्त होईल. प्रवासात नुकसान संभवते. शेअरसारख्या गुंतवणुकीपासून दूर रहा. प्रेम प्रकरणात मानसिक त्रास संभवतो. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. एखादी गुप्त बातमी समजेल. भाग्याची उत्तम साथ राहील. लाभाचे योग बनत आहेत. उपाय-पक्ष्यांकरता पाण्याची आणि दाण्याची सोय करावी.
मकर
आत्मबळ वाढेल. निर्णय अचूक ठरतील. कुटुंबात वादाचे प्रसंग येऊ शकतात. धन प्राप्तीकरता अधिक कष्ट करावे लागतील. प्रशासनिक कामात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार टाळावे. छोटय़ा गुंतवणुकीसुद्धा टाळाव्यात. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा त्रास संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. उपाय- शनिवारी योग्य गरजू व्यक्तीला तिळेल दान द्यावे
कुंभ
खाण्या-पिण्यामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी घरी इलाज न करता वैद्यकीय उपचार घ्यावे. नातेवाईकांची भेट होईल. संवाद साधताना अयोग्य शब्दांचा वापर टाळावा. धोकादायक गुंतवणूक टाळावी. गुप्त शत्रूंच्या कारवायांमध्ये वाढ होत आहे, सांभाळावे. जोडीदाराची मदत मिळेल. लाभाचे उत्तम योग बनत आहेत. उपाय -शंकराला गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करावा
मीन
कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे समाधान वाटेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्याल. कुटुंबीयांचे म्हणावे तसे सहकार्य न मिळाल्यामुळे मन उदास होऊ शकते. पैशांची चणचण वाटेल. प्रवास टाळावा. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरदार वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. वाहन चालवताना सावधान रहावे. भाग्य अनुकूल आहे. उपाय- वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करावी.