राशींचा देश टॅरोचा संदेश
12. 12. 2021
मेष
हा आठवडा धावपळीचा असणार आहे. मेषवाले या आठवडय़ात खूप व्यस्त असतील. कौटुंबिक जबाबदाऱया पार पाडण्यात दमछाक होईल. या सगळय़ात तब्येतीकडे दुर्लक्ष नको. अतिआत्मविश्वासही बरा नव्हे. पोटाच्या तक्रारीमुळे थोडे हैराण व्हाल. जे काम कराल त्यात यश मिळेल. पैशाची आवक सर्वसाधारण राहील. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीमुळे त्रास होईल.
वृषभ
कष्टाला पर्याय नाही हे सांगणारा हा आठवडा आहे. कौटुंबिक कलह सामंजस्याने सोडवा. लोकांना त्यांच्या कलेने घ्यावे लागेल. रविवारी एखाद्या घटनेमुळे मन उदास होऊ शकते. एखादी गुप्त बातमी कळेल. सांधेदुखी असेल तर दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कामाच्या ठिकाणी द्विधा मनःस्थिती राहील, याचा फायदा दुसऱयांनी घेऊ नये याची काळजी घ्या.
मिथुन
कामात विलंब झाल्याने चिडचिड होऊ शकते. अशावेळी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. घरातील बाचाबाचीचे प्रसंग बुद्धिचातुर्याने निभावून न्याल. काही गोष्टी तडजोडीने होतात हे सांगणारा हा आठवडा आहे. मुलांच्या बाबतीत एखादी समस्या भेडसावेल. पैशाची आवक ठीक राहील. कामाच्या ठिकाणी चातुर्य दाखवून अवघड काम करून दाखवाल.
कर्क
कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट या आठवडय़ात धोकादायक ठरू शकतो. कुटुंबातील वातावरण तणावमुक्त रहावे यासाठी प्रयत्न कराल. पाण्याच्या ठिकाणी सहलीला जाणे टाळा. सप्ताहाच्या मधे चांगली बातमी कळेल. सल्ला देणाऱया प्रत्येक व्यक्तीचा हेतू चांगलाच असतो असे नाही. दवाखान्यावर पैसे खर्च होणार. कामाच्या ठिकाणी आपण भले आणि आपले काम भले असे वागा.
सिंह
कुटुंबातील व्यक्तींबरोबर आदरपूर्वक वागलात आणि प्रियजनांच्या सहवासात राहिलात तर हा आठवडा सोन्यासारखा जाईल. शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक केलीत तर फायदा आहे. तब्येतीच्या बाबतीत तुम्ही सतर्क असता ही चांगली गोष्ट आहे पण थकवा येईल, असे काही करू नका. कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट करावे लागतील पण लाभाच्या संधीही आहेत.
कन्या
या आठवडय़ातील सगळय़ात भाग्यवान रास म्हणता येईल. तुमचा प्रभाव, करिश्मा आणि नाविन्यतेचा ध्यास हा लोकांमध्ये कौतुकाचा विषय होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागावे म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. तब्येत नरम गरम राहील. पण वातावरणच तसे आहे. चिंता नको. तुम्ही प्रगतीपथावर आहात आणि यश तुमचेच आहे.
तुळ
सहलीला किंवा गावाबाहेर काही दिवसांसाठी जाणार असाल तर घर पूर्ण सुरक्षित राहील याची खात्री करून मगच जा. सातत्याच्या अभावामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. संयम हा तुमचा स्वभाव जरी असला तरी हा आठवडा परीक्षा बघणारा आहे. कामाचे नियोजन फसण्याची शक्मयता आहे. ज्याला तुम्ही प्रेम समजता ते आकर्षण आहे हे समजून घ्या. आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. नव्या योजना बनवाल. कामाच्या ठिकाणी अडचणींवर मात कराल. पण कामे वेळेवर पूर्ण होतील याची खात्री नाही. नोकरीमध्ये प्रमोशनचा योग आहे. अनुभव कामाला येईल. तब्येतीत सुधारणा होईल. पैसे वाचवण्याकडे कल असेल. प्रभाव वाढेल. प्रशंसा होईल. दूरची यात्रा सध्या टाळलेली बरी.
धनु
तुमच्या प्रति÷sला धक्का लागलेला तुम्ही सहन करत नाही आणि ते योग्यच आहे. या आठवडय़ात तुम्ही ध्येय पूर्ण करण्यासाठी झटाल. अति संवेदनशील स्वभावामुळे लहान सहान गोष्टी मनाला दुखावतील. आठवडय़ाचा मधला काळ रोमँटिक आणि प्रेमाची उधळण करणारा असेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. पैशाची आवक सर्वसामान्य राहील. कामधंद्यामध्ये एखादी चिंता सतावेल.
मकर
व्यापार व्यवसायाकरिता हा आठवडा लक्षात राहण्यासारखा असणार आहे. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. वाहन मात्र जपून चालवा. भावाच्या किंवा बहिणीच्या तब्येतीची चिंता सतावेल. भाग्याची साथ जरा कमी आहे. कष्टाचे प्रमाण वाढवा. उधारी वसुलीसाठी प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी दुसऱयांचे ऐकावे लागेल. एकूण काय, तर या आठवडय़ात डोके शांत ठेवून वागा.
कुंभ
तुमचा चिकित्सक स्वभाव तुम्हाला फायदा करून देईल. नवीन कामे येतील. ती तुम्ही जिद्दीने पूर्ण कराल. नवीन वस्तू खरेदी कराल. पैशाची आवक उत्तम राहील. बरेच दिवस रेंगाळलेले एखादे काम पूर्ण झाल्याने आनंद होईल. कौटुंबिक मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. कामधंद्याच्या ठिकाणी तडजोडीचा मार्ग स्वीकारा. नवीन भेटीगाठी होतील.
मीन
तुमचे वागणे आक्रमक होऊ शकते आणि त्यामुळे एखादी क्यक्ती रोष धरू शकते. वैवाहिक जीवनात काही गोड तर काही कटू अनुभव येतील. तब्येत सांभाळा. लहान मोठी दुखणी डोके वर काढतील. मेहनती स्वभावाचे फळ मिळेल. गुरुवारच्या दरम्यान संधी आणि विरोध यांचा एकत्रित अनुभव घ्याल. कृष्णनीती वापरा आणि गोड बोलून कामे करून घ्या.