देवधर्म केला तरीही न चुके कर्मगती
भाग दुसरा
बुध. दि. 1 ते 6 जुलै 2020
जगातील सर्व प्राणीमात्र एकमेकांवर अवलंबून आहेत. माणसाने सर्वाविषयी कायम कृतज्ञ राहिले पाहिजे, हे शिकविणारी तिथी म्हणजे व्यासपौर्णिमा, व्यासमुनींना सर्वश्रे÷ गुरु मानलेले आहे. त्या दिवशी त्याचे पूजन करतात. गणेश, महादेव, आकाशातील चंद्र, सूर्यासह सर्व तारे, तसेच चराचर सृष्टीला गुरुस्थानी मानलेले आहे. सर्वश्रे÷ गुरु म्हणजे माता-पिता हेच आहेत. आपल्याला अन्नाला लावणाऱया, जीवनाला योग्य दिशा दाखविणाऱया व्यक्तींना गुरुस्थानी मानून त्यांच्याविषयी कृतज्ञभाव व्यक्त करण्याचा हा दिवस. उपकारकर्त्यांची जाण ठेवली पाहिजे. ज्यांच्या मार्गदर्शन व मदतीमुळे आपला उदरनिर्वाह चालतो, त्या सर्वांनाच गुरुस्थानी मानले पाहिजे. आपली सुख-दु:खे बाजूला ठेवून संसाराचा गाडा ओढणारे आई-वडील, पती-पत्नी, बहीण, मावशी, आत्या व सासू-सासरे, दीर, नणंदा भावजया, मुली व सुना तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालावा, यासाठी कोणतीही तक्रार न करता राबणारा कर्ता, पुरुष संकटकाळी नातेवाईकापेक्षाही लवकर येऊन मदत करणारे शेजारी, नोकरी देणारे मालक, कामाचा गाडा ओढणारे कर्मचारी, आपल्या घराचे रक्षण करणारे मुके प्राणी, शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक, आपल्याला सुखरुप घेऊन जाणारे वाहन, या साऱयांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गरज असताना गोड बोलून मदतीची याचना करतात, पण त्यांच्या गरजेच्यावेळी मात्र हात वर करतात, अशा कृतघ्न लोकांची वेळ फिरली की दैव देखील त्यांना साथ देत नाही. परमेश्वरी शाप लागतो, हाती असलेले सर्व काही नष्ट होऊन जाते, हाती पैसा असूनही महाभयानक रोग होऊन हालहाल होऊन मरण्याची पाळी येते, यासाठी उपकारकर्त्याला विसरु नये. गेल्या सहा महिन्यापासून कोरोनासारख्या भयानक सांसर्गिक रोगाने जगाला ग्रासले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. लाखो लोकांच्या नोकऱया गेल्या. अशा लोकांचा विचार न करता खेळांचे, कसोटी सामने भरविण्याचा विचार केला जातो. गरीब मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सरकार माध्यान्ह आहार, पुस्तके व सायकली, गणवेष वगैरे देते, गरिबांना मोफत शिक्षण देते, मग आपण कशाला चिंता करायची? मुले आपोआप शिकतील, अशी यांची धारणा असते. असे लोक कृतज्ञ नसतात, म्हणून सरकारने जातीयता व इतर प्रकारे फुकटच्या सवलती देणे बंद केले पाहिजे. अशा सवलतीने माणसे आळशी व व्यसनाधिन बनतात. मुले ऐकत नाहीत, उद्धटपणाने वागतात. चारचौघात अपमान करतात. काडीचीही उत्पादकता नसलेल्या क्रिकेटसारख्या खेळामागे लागून हजारो तास वाया घालवितात. अशाने आपला देश काय सुधारणार? कोरोनाने मनुष्यप्राण्याला कसे जगायचे, हे शिकविले, पण आपण त्यापासून काहीही शिकत नाही. आपल्या हातून कळत नकळत अनेक चुका होत असतात, पण चुकून जरी आगीत पाय पडला तरी तो भाजणारच, या न्यायाने आपल्या हातून घडणाऱया असंख्य बऱया-वाईट कृत्याचा हिशोब म्हणजेच कर्मगती. ती कुणाला केव्हा भोगावी लागेल ते सांगता येणार नाही. या जन्मात किंवा पुढील जन्मात तरी ती भोगावीच लागते. मागील जन्मात कोण होतो व पुढील जन्म कोणता असेल, हे कळणार नाही. यासाठीच चांगल्या मार्गाने पुण्याचा साठा वाढवित राहिले पाहिजे, तरच पुढील पिढी सुखात राहील. पूर्वी अत्यंत गर्भश्रीमंत व खानदानी ऐषआरामात लोळलेल्या घराण्यांची आजची पिढी कशा अवस्थेत आहे ते पहा म्हणजे कर्मगती कशी बाधते हे सहज समजून येईल.
मेष
गुरु अनुकूल असल्याने शिक्षण व संततीच्या भाग्योदयाच्यादृष्टीने अनुकूल काळ. घराण्याचा नावलौकिक व प्रति÷sच्या दृष्टीने महत्त्वाचे योग. धनलाभाच्या संधी येतील. शत्रुत्व नाहीसे करण्यास योग्य काळ. ग्रहमान चांगले असले तरी वादग्रस्त व्यक्तीमुळे गंभीर वास्तुदोषही निर्माण होईल. सर्व तऱहेच्या तीक्ष्ण वस्तुंपासून सांभाळावे. हौस किंवा आवड म्हणून जुन्या-पुराण्या वस्तू खरेदी करू नका.
वृषभ
अष्टमात गुरु आर्थिक लाभाच्या बाबतीत अनुकूल आहे. घराचे बांधकाम परमिशन अथवा तत्सम सरकारी कामातील अडथळे दूर होतील. मान-सन्मान प्रति÷ा वाढेल. कौटुंबिक बाबतीत सर्व इच्छा पूर्ण होतील. महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची वाच्यता करू नका, अन्यथा शत्रू त्याचा गैरफायदा घेतील. अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. मित्र, मैत्रीणी व संततीच्या बाबतीत अविस्मरणीय घटना.
मिथुन
विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची शुभ घटना घडण्याचे योग. भाग्योदय, भरभराटीच्या दृष्टीने शुभ योग. काही प्रकरणामुळे घरमालक व भाडेकरू संबंध बिघडतील. त्यासाठी सावध रहा. नोकरीत स्थलांतर अथवा प्रवास.
कर्क
अविचाराने केलेले काम अंगलट येऊ शकते. जे काम कराल ते आपल्या आवाक्मयाबाहेरचे असू नये याची काळजी घ्या. एखाद्या प्रकरणात तुमची उपस्थिती अति महत्त्वाची ठरेल. प्रेम प्रकरणात असाल तर फसगत, तसेच काही नको त्या प्रयोगांचीही शक्मयता राहील. मोबाईल अथवा तत्सम माध्यमे जपून वापरा.
सिंह
शहानिशा केल्याशिवाय कुणालाही आपले वाहन देऊ नका. राशीस्वामी रवि मित्र राशीत आहे. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील यश मिळवाल. पण तुमच्या कुंडलीतही तसे योग असणं आवश्यक. नोकरी, व्यवसायात लाभदायक वातावरण. अपघात, आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया यापासून जपावे लागेल. कोणतेही नवीन काम करताना पूर्व नियोजन करा.
कन्या
वास्तुशास्त्राच्या मागे लागू नका. आर्थिक फसवणूक होईल. खर्च अथवा मोडतोड न करता फक्त कुलदेवतेची आराधना करा. बरेच दोष नष्ट होतील. फार लांबचे प्रवास टाळा. अथवा जपून करा. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले योग. प्रमोशन, इच्छीत स्थळी बदली. स्वत:ची वास्तू होण्याच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान.
तुळ
गुरुची शुभ दृष्टी भाग्यस्थानावर आहे. सर्व तऱहेने भाग्योदयकारक ग्रहमान आहे. मनातील अवघड इच्छाही पूर्ण होऊ शकतील. स्वत:चे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीतून धनलाभाचे योग. नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. पण योग्यता असूनही नको ते काम मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. अशावेळी मन शांत ठेवून मगच निर्णय घ्यावेत.
वृश्चिक
गुरु धनस्थानी असल्याने आर्थिक लाभ. धनलाभाव्यतिरिक्त वास्तू, जागा, वाहन यांचा लाभ होण्याचे योग. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा स्वतंत्र ठसा उमटेल. आतापर्यंत अत्यंत अवघड वाटणारी आर्थिक कामे चुटकीसरशी होतील. नोकरीसाठी चालू असलेल्या परीक्षेत यश मिळेल. घरात कुणाचे तरी मंगल कार्य ठरेल.
धनु
नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल संभवतात. बदली बढतीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल.ऑनलाईन किमती वस्तू खरेदी करताना सांभाळा. गुरु शुभ असला तरी शनिची साडेसातीही सुरू आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. कुणी मदतीची याचना करीत असेल तर खऱया खोटय़ाची शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेऊ नका.
मकर
प्रवास व पत्रव्यवहार या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. जुनी येणी वसूल होतील. बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक घडी व्यवस्थित बसेल. बरेच दिवस रखडलेले महत्त्वाचे काम या आठवडय़ात होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. अत्यंत आवश्यक अशा कामासाठी गरज असलेल्या व्यक्तींची भेट होईल.
कुंभ
बऱयाच गोष्टी मनासारख्या होतील. नोकरी व्यवसायाला शुभ कलाटणी, पण कौटुंबिक बाबतीत जरा क्लेशदायक वातावरण राहील. एखाद्याचे लग्न ठरविण्यात तुमचा मोलाचा वाटा असेल, पण त्याची पावती मात्र मिळणार नाही. अति मोह व अति आशा यामुळे नुकसान. त्यासाठी संयमाने वागावे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
मीन
हातावरील रेषेपेक्षा चांगले विचार आपले नशीब घडवतात, याचा अनुभव येईल. अडचणी आल्या म्हणून निराश न होता त्यामागील कारणे शोधा. बरेच काही साध्य होईल व मनशांतीही मिळेल. व्यवसायात नवीन बदल करण्यास अनुकूल काळ. जे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल. दहाव्या गुरुमुळे आगामी वर्षभर लाभदायक वातावरण राहील.