प्रतिनिधी/ रत्नागिरी
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चांदीची साखळी लुटल्याचा प्रकार तालुक्यातील पावस भटवाडी येथे समोर आल़ा ही घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडल़ी याप्रकरणी सचिन धोंडू कीर यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केल़ी धिरेंद्र कुमार व मोहम्मद मोहिद्दीन (दोघे ऱा बिहार) अशी संशयितांची नावे आहेत़
दोघांनाही न्यायालयापुढे मंगळवारी हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पावस भटवाडी येथे पितळी भांडी पॉलिश करण्याचा करण्याचा बहाणा करून फिरत होत़े यावेळी कीर यांच्याकडील पितळी तांब्या व मूर्ती त्यांनी पॉलिश करून दिल़ी यावेळी सचिन कीर यांनी कमरेची साखळी पॉलिश करण्यासाठी दिल़ी मात्र ही साखळी आरोपींनी परत न करता त्या ठिकाणाहून पोबारा केल़ा आपली फसवणूक झाल्याचे समजताच कीर यांनी पूर्णगड पोलिसात तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोघा संशयितांना अटक केल़ी याप्रकरणी पूर्णगड पोलीस पुढील तपास करत आहेत़