मुंबई/प्रतिनिधी
अलीकडेच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडेंना डावलल्याने मुंडे भगिनी आणि कार्यकर्ते नाराज होते. पण पंकजा यांनी मुंबई येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद दिल होतं. आता आणखी एक वादाचा मुद्दा पुढं आला आहे. मंत्री भागवत कराडांच्या जन आशीर्वाद यात्रेतून बीडला वगळण्यात आलं आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आता भागवत कराडांची महाराष्ट्रातून जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. मात्र या आशीर्वाद यात्रेतून बीडला वगळण्यात आलं आहे. बीड सोडता मराहाष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही आशीर्वाद यात्रा पोहोचणार आहे. त्यामुळे आशीर्वाद यात्रेतून बीडला का वगळलं? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सोबतच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये त्या भागवत कराड यांचा सत्कार करताना दिसत आहेत. पंकजा दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी भागवत कराड यांचा सत्कार केल्याची माहिती समोर आली आहे