प्रतिनिधी / बेळगाव
भाग्यनगर येथील आयबॉक्स या शोरूममध्ये सनगॉगल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जुवळी यांनी केले. या दोन दिवसांच्या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
चोखंदळ ग्राहकांसाठी विविध ब्रॅन्डस्चे गॉगल ही एक पर्वणी ठरली. या प्रदर्शनात नामांकित सहाहून अधिक कंपन्यांचे गॉगल मांडण्यात आले होते. तरुणाईसह ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट देऊन गॉगल खरेदी केली. याप्रसंगी आयबॉक्सतर्फे सुनील नाईक, मेघन व वरुण नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले.