बेळगाव /प्रतिनिधी
भाग्यनगर येथील नववा क्रॉस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरात श्री गणेश मूर्ती प्राणप्रति÷ापना महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. या निमित्त अनगोळ आणि भाग्यनगर परिसरातून बुधवारी श्री मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. भाग्यनगरचा राजा या नावाने प्रसिद्ध असणाऱया या श्री मूर्तीची मिरवणूक लक्षवेधी ठरली. अनगोळ नाका येथून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक किरण परब यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. रमेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या शोभायात्रेमध्ये सुहासिनी मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मिरवणूक लक्षवेधी झाली होती. कडोली येथील ढोल पथक सहभागी झाले होते. एकनाथ पाटील यांनी या ढोल पथकाचे संयोजन केले होते. उपक्रम संयोजनासाठी देवस्थान कमिटीचे यल्लाप्पा डोणकरी, संजय बेळगावकर, कृष्णा मुतगेकर, चंद्रकांत हरपणहल्ली, सौरभ पाटील, विजय मुत्तेप्पागोळ, रणजीत चौगुले, आदित्य सांबरेकर, चंदू शेट्टी, अनिकेत हदगल, राजू जांबोटकर आदींसह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या सोहळय़ाच्या निमित्ताने सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. 31 रोजी दुपारी 12.30 वा. महाप्रसादाचे वितरण होणार आहे. यामध्ये भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.