प्रतिनिधी/ बेळगाव
चौथा क्रॉस भाग्यनगर अनगोळ येथील चिमुकल्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. रत्नागिरी जिल्हय़ात सुवर्णदुर्ग किल्ला आहे. इतिहासाची साक्ष देणाऱया या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील शिवभक्तांची गर्दी होत आहे.
प्रणव पिसे, वेदांत गुरव, आदिराज माडकर, मदन गुरव, नागराज राहुल यासह इतर चिमुकल्यांनी एकत्रित येवून हा सुंदर किल्ला बनविला आहे. बेळगाव परिसरात दिवाळीच्या काळात किल्ले बनविण्याची प्रथा आहे. त्यानुसार बालचमूंनी मातीचे सुबक असे किल्ले बनविले आहेत.